पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस दलात नव्या वाहनांचा लोकार्पण सोहळा कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होणार

Spread the love

धाराशिव – जिल्ह्यातील पोलीस दलाची कार्यक्षमता,गतिमानता आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी विविध अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला असून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या नव्या वाहनांचे लोकार्पण आज १ मे महाराष्ट्र दिनी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,पोलिस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ च्या निधीतून ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे.या उपक्रमामुळे पोलीस विभागाच्या दैनंदिन कामकाजासह विशेष बंदोबस्त व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे.पोलीस दलासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या वाहनांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासाठी ५ स्कॉर्पिओ क्लासिक वाहने,प्रथम प्रतिसाद पथक (First Mobile) साठी ६ बोलेरो निओ वाहने,डायल ११२ अंतर्गत दुय्यम प्रतिसाद पथकासाठी १४ बोलेरो बेसिक मॉडेल वाहने तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी १ अशोक लेलँड ट्रकचा समावेश आहे.

ही वाहने पायलटिंग,एस्कॉर्ट सेवा, व्हीआयपी बंदोबस्त,जयंती उत्सव, यात्रा बंदोबस्त तसेच विशेष सुरक्षा नियोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. नव्या वाहनांमुळे घटनास्थळी जलद पोहोचणे,आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत,कायदा व सुव्यवस्था राखणे आणि मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रभावी समन्वय साधणे अधिक सुलभ होणार आहे.

विशेषतः डायल ११२ आणि प्रथम मोबाईल सेवांसाठी उपलब्ध होणारी वाहने नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित प्रतिसाद देण्यास उपयुक्त ठरणार असून ग्रामीण व शहरी भागातील पोलीस यंत्रणा अधिक बळकट होईल.आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध ट्रकमुळे नैसर्गिक आपत्ती,दुर्घटना किंवा बचावकार्याच्या वेळी आवश्यक साधनसामग्री त्वरीत पोहोचविणे शक्य होणार आहे.या वाहनांच्या लोकार्पणामुळे पोलीस दलाची आधुनिकता वाढून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक सक्षम,सज्ज आणि प्रभावी यंत्रणा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नव्या पोलीस वाहनांचे लोकार्पण केल्यानंतर नव्याने पोलिस दलात समाविष्ट करण्यात आलेल्या वाहनांपैकी स्कॉर्पिओ हे वाहन स्वतः पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी चालवित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आयोजित कार्यक्रमस्थळी आगमन झाले.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *