धाराशिव विभागाला 30 ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बसची भेट; खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण

Spread the love

धाराशिव | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) धाराशिव विभागाच्या ताफ्यात आज 30 नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांची भर पडली. या आधुनिक बसगाड्यांचे लोकार्पण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन खासदार ओमराजे निंबाळकर यांचे स्वागत केले. लोकार्पण सोहळ्यास एसटीचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी विभाग नियंत्रक अजय पाटील, यंत्र अभियंता रविराज घोगरे, आगार प्रमुख प्रवीण भोंडवे, विभागीय वाहतूक अधिकारी मथुरा जाधवर, संतोष कोष्टी, स्थानक प्रमुख मुकेश कोमटवार, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक बालाजी बारते, वाहतूक नियंत्रक याया काझी, सुरज पायाळ यांच्यासह एसटीचे अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध असून 3×2 आसन व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बसची 56 प्रवासी क्षमता असून प्रवाशांना अधिक सुरक्षित व आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी, “एसटी सेवा प्रत्येक गाव आणि खेड्यापर्यंत वेळेत पोहोचली पाहिजे. बसची कमतरता किंवा इतर अडचणी असल्यास पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करून धाराशिव विभागासाठी आणखी बसेस उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू,” असे आश्वासन दिले.

कार्यक्रमास शिवसेनेचे रवि कोरे आळणीकर, गजानन नलावडे, सोमनाथ गुरव, संजय उर्फ पप्पू मुंडे, अमित उंबरे, आदित्य पाटील, काका शिनगारे, गणेश जमाले, शिवयोगी चपने, भिमा अण्णा जाधव, प्रशांत साळुंखे, तात्या पडवळ, दादा घोडके यांच्यासह अनेक प्रवासी व नागरिक उपस्थित होते.

धाराशिव विभागाला 30 ‘राजमाता जिजाऊ’ एसटी बसची भेट; खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण

धाराशिव एसटी विभागात 30 नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण. आधुनिक सुविधा, 56 प्रवासी क्षमता आणि ग्रामीण भागात बससेवा मजबूत करण्याचा संकल्प.

धाराशिवला 30 नवीन ST बस
खा. ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण

  • Related Posts

    विकसित भारतासाठी विकसित धाराशिव’चा संकल्प ;

    Spread the love

    Spread the loveशेतकरी,महिला,युवक आणि उद्योग विकासाच्या केंद्रस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू आहे.शेतकऱ्याच्या हातात…

    तुळजापूरच्या सुरक्षिततेला सीसीटीव्हीचे कवच; भाविकांचा विश्वास अधिक दृढ होणार पालकमंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर येथे सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे लोकार्पण धाराशिव – आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक तुळजापूरमध्ये येतात.या भाविकांची तसेच नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असून,‘सुरक्षित तुळजापूर ही केवळ शासनाची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *