पॉश कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षमता बांधणी कार्यक्रम

Spread the love

पुणे, दि. ९ एप्रिल २०२६ — महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रशिक्षण प्रबोधिनी (यशदा) यांच्या संयुक्त विद्यमाने “कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई, निवारण) कायदा 2013” अर्थात पॉश कायद्यावरील एक दिवसीय क्षमता बांधणी कार्यक्रम आज यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात आला.

पॉश कायद्याच्या तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक तक्रार निवारण समिती (Local Complaint Committee) कार्यरत आहेत. राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील या समितीतील सदस्यांसाठी क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

राज्य महिला आयोगाने, राज्यातील स्थानिक समित्यांची कार्यक्षमता वाढवणे, तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करणे या उद्देशाने या क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन यशदा, पुणेचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती नंदिनी आवडे यांच्या उपस्थितीत झाले.
कार्यक्रमादरम्यान स्थानिक तक्रार निवारण समितीची रचना, कार्यपद्धती, चौकशी प्रक्रिया आणि जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, कॉर्पोरेट क्षेत्रातील पॉश कायद्याच्या अंमलबजावणीतील व्याप्ती व अडचणी, माध्यमांमधील महिला सक्षमीकरण आणि SHE BOX पोर्टलची माहिती या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात विविध शासकीय अधिकारी, समिती सदस्य आणि संबंधित क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले होते.दिवसभरातील विविध सत्रांनंतर कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने आयोगाचे वरिष्ठ समुपदेशक श्री लक्ष्मण मानकर यांनी केला.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *