धाराशिवमध्ये अवैध अफू लागवडीवर मोठी कारवाई! ७२ लाखांची अफू जप्त

Spread the love

११.०२.२०२६ रोजी वाशी तालूक्यातील मौजे दशमेगाव शिवारात एका शेतक-याने लपून अफूची लागवड केलेली आहे, अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावरून पुढील कायदेशीर कारवाईकरीता मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक धाराशिव यांनी पोनि श्री विनोद इज्जपवार स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांना सुचित केले होते. त्यांनी तात्काळ सदरबाबत कारवाई करणेकामी सपोनि सुदर्शन कासार व पथक यांना आदेशित केले.

सदर बातमीची खात्री करण्याकरीता सर्वे क्र १६३, मौजे दशमेगाव, ता वाशी जि धाराशिव येथे भेट दिली असता तेथे कांदयाच्या आंतरपिकात मोठ्या प्रमाणात अफूची लागवड केली असल्याचे दिसून आले. नमुद अफुच्या झाडांना पांढरी गुलाबी रंगाची फुले तसेच मोठी बोंडे असल्याचे दिसून आले. सदरचे शेल हे समाधान मनोहर उघडे, रा दशमेगाव, ता वाशी जि धाराशिव यांचे असून त्यानेच सदर अफुची लागवड केली असल्याचे आजूबाजुच्या शेतक-यांनी सांगितले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांनी केलेल्या कारवाईमध्ये समाधान मनोहर उघडे, रा दशमेगाव, ता वाशी जि धाराशिव याचे शेतातून एकूण ४८५.६५ किलो वजनाची पांढरी गुलाबी रंगाची फुले तसेच मोठी बोंडे असलेली अफूची झाडे श्री किसन सांगळे नायब तहसीलदार, वाशी, ०२ शासकीय पंच यांचे उपस्थितीत जप्त करण्यात आली आहेत. सपोनि सुदर्शन कासार यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून समाधान मनोहर उघडे, रा दशमेगाव, ता वाशी जि धाराशिव याचे विरोधात विनापरवाना, स्वतःच्या फायदयाकरीता अफूची लागवड केली म्हणून पोस्टे वाशी गुरनं ४५/२०२६ क ८ (क) सह १८ एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी रितू खोखर, पोलीस अधिक्षक धाराशिव शफकत आमना अपर पोलीस अधिक्षक धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली मेघना आय.एन, प्रशि. भापोसे अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, पोह जावेद काझी, पोह दत्तात्रय राठोड, पोह दयानंद गादेकर, पोना अशोक ढगारे, चापोह सुभाष चौरे, चापोह नागनाथ गुरख व पोस्टे वाशीचे सपोनि यशवंत घोडके, पोह बोरकर, जगताय,मिसाळ, खैरे, घुले यांचे पथकाने केली आहे.

  • Related Posts

    बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ…

    आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; 146 गुन्हे दाखल, 126 आरोपी अटकेत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) : विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *