कला केंद्रात बारी पाहण्यासाठी गेला,परतताना जीव गमावून बसला

Spread the love

धाराशिव – (प्रतिनिधी ) चोराखळी ता. कळंब येथील महाकाली कला केंद्रावर बारी पाहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा त्याच्याच मित्रांनी खून केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात मयताचे वडील भागवत मुंडे यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सतीश मुंडे (वय 37) रा.साळेगाव ता.केज जि.बीड असं मयत तरुणाचं नाव असून घटनेच्या दिवशी तो आपल्या मित्रांसोबत धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रावर बारी पाहण्यासाठी गेला होता. मित्रांनी दारू पाजून बारी पाहण्यासाठी नेले आणि बारी पाहून परत जाताना जुन्या भांडणाचा राग मनात धरून जीवे मारल्याचा आरोप कुटुंबांनी केला आहे. शेख अजमुद्दिन ,शेख रौफ ,संजय गीते, मधुकर इंगळे आणि दत्ता तोंडे यांनी लाथा बुक्क्यांनी सतीश मुंडे यांच्या पोटावर आणि छातीवर मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे
गेल्यावर्षीच गोळीबाराच्या घटनेने आणि एका युवकाच्या खुण प्रकरणामुळे हे महाकाली कला केंद्र चर्चेत आलं होतं.त्यामुळे जिल्ह्यातील इतर कला केंद्रावर तपासणी करून नियमाचा बडगा दाखवत सर्व कला केंद्र बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे,परंतु महाकाली कला केंद्राविषयीच प्रकरण उच्च न्यायालयात सुरू असून असल्याने ते कलाकेंद्र सुरू आहे. अशा या कला केंद्रामुळे परिसरातील नागरिकांची व गावाची मात्र हकनाक बदनामी मात्र मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या चर्चा नागरिकांतून एकावयात येत आहेत. त्यामुळे या कलाकेंद्राविषयी लवकरात लवकर निर्णय लागावा याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेष मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ व वास्तव्य असलेल्या चोराखळी गावाची मात्र मोठ्या प्रमाणावर बदनाम होत असल्याचे पाहून परिसरातील नागरिक ही अस्वस्थ असल्याचे दिसून येत आहेत.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    हशिश ऑईल तस्करी प्रकरणात मोठे यश; धाराशिव पोलिसांनी गाठला मुख्य आरोपी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : नळदुर्ग पोलिसांनी 10 कोटी 38 लाख 20 हजार रुपये किमतीच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला ओडिशा राज्यातील अतिशय दुर्गम आणि नक्षलप्रभावित भागातून अटक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *