तुळजापूर तालुक्यातील बोगस खत प्रकरणी संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Spread the love

शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचे कृषी विभागाला निवेदन; पारदर्शक चौकशी व निलंबनाची मागणी

धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे कथित बोगस खत विक्री प्रकरणी संबंधित दुकानदार व खत कंपनीसोबतच कृषी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, दिनांक १८ जून २०२६ रोजी अंदूर गावातील अनेक शेतकऱ्यांनी सुमारे ४०० ते ५०० बॅग कथित बोगस खत खरेदी केल्याची बाब समोर आली. हा प्रकार संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला असून जिल्हाधिकारी यांनी संबंधित दुकानदार व खत कंपनीच्या मालकाविरोधात कारवाईचे आदेश दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

मात्र या प्रकरणात केवळ दुकानदार व कंपनी नव्हे तर तालुका कृषी विकास अधिकारी, तालुका गुणनियंत्रक अधिकारी तसेच नळदुर्ग व अंदूर येथील कृषी सहाय्यक यांचीही जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यासंदर्भात कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय, जिल्हा कृषी विकास अधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले असून त्याच्या प्रती कृषिमंत्री, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच लोकायुक्त व उपलोकायुक्त कार्यालयाकडेही पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आंदोलनाचा इशारा देताना मनोज जाधव यांनी म्हटले आहे की, येत्या १५ दिवसांत योग्य ती कारवाई न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.

  • Related Posts

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    धाराशिव कृषी विभागातील काही कार्यालयांतील कारभाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मनोज दगडू जाधव यांनी कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव जिल्ह्यात युरिया खत वितरणातील कथित अनियमितता, फवारणी किट खरेदी-वितरण प्रक्रियेमधील गैरव्यवहार तसेच कृषी विभागातील काही कार्यालयांतील कारभाराबाबत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *