तुळजापूर येथे भरदिवसा मारहाण व गोळीबार; गुंडांवर कठोर कारवाईची मागणी

Spread the love

धाराशिव महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध

धाराशिव | प्रतिनिधी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर शहरात दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी भरदिवसा घडलेल्या गंभीर मारहाण व गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. चाकू व लोखंडी रॉडच्या सहाय्याने झालेल्या या हाणामारीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेचा धाराशिव महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस अधीक्षक, धाराशिव यांच्याकडे धाराशिव महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर परिसरात काही गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती खुलेआम ड्रग्स, अवैध दारू तसेच इतर बेकायदेशीर धंदे चालवत असून, यामुळे शहरात सातत्याने दहशत निर्माण होत आहे.

तुळजापूर हे राज्यातील तसेच देशातील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान असून, अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांमुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीची बदनामी होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक व कायदेशीर कारवाई करावी, तसेच तुळजापूर शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर कायमस्वरूपी अंकुश आणावा, अशी ठाम मागणी धाराशिव महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे तुळजापूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिस प्रशासनाने तत्काळ कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    तुळजापूर तालुक्यातील बोगस खत प्रकरणी संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

    Spread the love

    Spread the loveशेतकरी पुत्र मनोज जाधव यांचे कृषी विभागाला निवेदन; पारदर्शक चौकशी व निलंबनाची मागणी धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे कथित बोगस खत विक्री प्रकरणी संबंधित दुकानदार व खत…

    धाराशिव एसटी बस आगारामध्ये दैनंदिन चालक / वाहक ड्युटी बुकिंग मध्ये मनमानी कारभार, वरिष्ठ विभागीय कार्यालय यांच्या आदेशास केराची टोपली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) धाराशिव एसटी आगारातील चालक-वाहकांच्या दैनंदिन ड्युटी बुकिंग प्रक्रियेत गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, वरिष्ठ विभागीय कार्यालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही नियमांचे उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक आरोप कर्मचारी वर्गातून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *