शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अधीक्षक अभियंता व वैद्यकीय अधिष्ठाता यांना निवेदन.

Spread the love

धाराशिव – शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांच्या वतीने धाराशिव बेंबळी महामार्गावर सतत होणाऱ्या अपघात होऊन जीवित व वित्तहानी होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी बॅरिकेट्स उभारावे, स्पीड ब्रेकर उभा करावे, रस्त्यावर दिशादर्शक फलक बसवावे, वाहतूक पोलीस कर्मचारी नियुक्त करावे. यामुळे या दाट लोकवस्तीच्या भागात पुन्हा अपघात होणार नाहीत यासाठी मा अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ धाराशिव यांना निवेदन देण्यात आले. यालाच अनुसरण दुसरे एक निवेदन मा अधिष्ठाता मॅडम शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक रुग्णालय व महाविद्यालय धाराशिव यांना आयुर्वेदिक रुग्णालय/ महाविद्यालय येथे अपघात झालेल्या व इतर रुग्णावर प्राथमिक उपचार होणे बाबत निवेदन देण्यात आली त्यात धाराशिव शहरा मधून एक राष्ट्रीय महामार्ग व इतर महामार्ग जात असल्यामुळे या महामार्गावर कायम अपघात होत असतात. अपघातग्रस्तांना तातडीची प्राथमिक आरोग्य सुविधा घेण्यासाठी सुद्धा शासकीय रुग्णालय येथे जावे लागते. शहरातील वाहतूक कोंडीमुळे बऱ्याच वेळा अपघातग्रस्तांचे जीव जाण्याचे प्रसंग घडत आहेत. धाराशिव शहरातील अनेक नागरिकांनी व महामार्गावर प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी आयुर्वेदिक रुग्णालयात ही सुविधा नसल्याची खंत बोलून दाखवल्यामुळे व राग व्यक्त केल्याने या महामार्गावर व इतर राज्य मार्गावर होणाऱ्या अपघातातील अपघातग्रस्तांना तातडीची प्राथमिक वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक रुग्णालय मध्ये एक कॅज्युअल्टी विभाग 24 तास व एक वैद्यकीय अधिकारी कायम या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा. यावेळी समितीचे उपाध्यक्ष श्री हनुमंत यादव सचिव श्री आकाश भोसले शहराध्यक्ष श्री संतोष घोरपडे श्री हनुमंत तांबे श्री अमोल साळुंके, श्री योगेश आतकरे श्री रामानंद माडेकर, श्री प्रथमेश जगदाळे, श्री, अनंत झाडके, श्री व्यंकटेश पडिले उपस्थित होते.

  • Related Posts

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    तुळजापूर तालुक्यातील बोगस खत प्रकरणी संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

    Spread the love

    Spread the loveशेतकरी पुत्र मनोज जाधव यांचे कृषी विभागाला निवेदन; पारदर्शक चौकशी व निलंबनाची मागणी धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे कथित बोगस खत विक्री प्रकरणी संबंधित दुकानदार व खत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *