फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

Spread the love

धाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.मोर्चास अनुसरून समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून आरक्षण उपवर्गीकरणा बाबतची भूमिका राज्य व केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्याची मागणी करण्यात आली.या मोर्चात विविध सामाजिक संस्था,संघटना व दानशूर व्यक्तींनी आंदोलकांसाठी पिण्याचे पाणी, फळे,बिस्किटे आदींची व्यवस्था केली होती.मुसळधार पाऊस सुरू असतानाही जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि हजारो भीमअनुयायी व समाजबांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.आंदोलनकर्त्यांचा उत्साह आणि एकजूट विशेष लक्षवेधी ठरली.पाणी वाटप करतांना समितीचे अध्यक्ष गणेश रानबा वाघमारे,सचिव प्रवीण जगताप,उपाध्यक्ष संजय गजधने,अंकुश उबाळे,बलभीम कांबळे,संपतराव

शिंदे,डॉ.रमेश कांबळे,किसन घरबुडवे,अतुल लष्करे,श्रीकांत गायकवाड,युवा भीम शक्ती सेनेचे महादेव भोसले,स्वराज जानराव,विशाल घरबुडवे,राहुल राऊत,नाना वाघमारे,मुकेश मोटे,श्री सिरसाठ,तसेच कुसुम वाघमारे,कल्पना घरबुडवे,जयश्री चव्हाण,सविता सोनवणे,कालिंदा बनसोडे,इंदु वाघमारे,भागाबाई बनसोडे अन्य जणांनी पाणी वाटपात सहभागी झाले.मोर्चातील स्वच्छता नगर परिषद, रहदारी व सुरक्षा पोलीस प्रशासन,पत्रकार बांधव व इतर विभाग प्रशासनाने योग्य ते सहकार्य केले याबाबत फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने गणेश वाघमारे यांनी आभार मानले व भर पावसात भिजत सहभागी झालेले भीम अनुयायी सर्व समाज बांधव भगिनी सह आरक्षण उपवर्गीकरण अबकड विरोधी कृती समितीचे देखील कौतुक करण्यात आले.

  • Related Posts

    तगर भूमी जेतवन बुद्ध विहारात वर्षावास महोत्सवाचे आयोजन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वर्षावास निमित्त निसर्गाच्या सानिध्यात तगर भुमी जेतवन बुद्ध विहार,गडदेवदरी परिसर,धाराशिव येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.मौजे गडदेवदरी घाटंग्री परिसर ता.जि.धाराशिव येथे तीन…

    ईद-ए-मिलाद निमित्त ‘लोकविचार’चे संपादक अमजद सय्यद यांचा रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश

    Spread the love

    Spread the loveईद-ए-मिलाद निमित्त नगरसेवक अझहर मुजावरांचा उपक्रम; एसीएम ग्रुपच्या रक्तदान शिबिरात २००-३०० युवकांचा सहभाग धाराशिव – “पैगंबर हजरत मोहम्मद (स.अ.व.)” यांच्या जन्मदिनी साजरा केला जाणारा ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांसाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *