छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अतिक्रमण मुक्त व परिसर स्वच्छता यासाठी समितीचे निवेदन

Spread the love

धाराशिव – शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्यावतीने धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरातील बरेच अनधिकृत अतिक्रमण वाढलेले आहे.फळांचे गाडे,खाद्यपदार्थाचे स्टॉल, प्रवासी रिक्षा वाहने व कचरा टाकण्यामुळे या परिसरात अस्वच्छता दुर्गंधी व वाहतुकीची खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे.याच परिसरात वर्दळीच्या गर्दीमुळे मद्यप्राशन केलेले काही लोक लघुशंका व घाण करण्याच्या घटना सतत घडत आहेत.याच परिसरात बहुसंख्य डिजिटल बोर्ड लावले जातात. यामुळे पुतळा परिसराचे सौंदर्य नाहीसे होत आहे. शिवरायांच्या पुतळ्याचा बहुतांशी भाग साफसफाई विना राहत आहे. या सर्व घटकांमुळे समस्त धाराशिवकर शिवभक्तांच्या भावना अत्यंत तीव्र झालेल्या आहेत.या सर्व गोष्टींना पायबंद घालण्यासाठी व साफसफाईसाठी 24 तास नगर परिषदेचे दोन कर्मचारी नियुक्त करावे,पुतळा परिसरातील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे,पुतळा परिसराचे रुंदीकरण करण्यात यावे, पुतळा परिसरात डिजिटल बोर्ड लावण्यास बंदी घालण्यात यावी, पुतळ्याच्या पावित्र्यासाठी व संरक्षणासाठी आपल्या शासकीय स्तरावरून पोलीस विभागाशी पत्रव्यवहार करून 24 तास पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी.शिवछत्रपतींचा पुतळा व परिसरात काही अघटीत दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील.वरील मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशा प्रकारचे निवेदन मा.मुख्याधिकारी मॅडम नगरपरिषद धाराशिव यांना देण्यात आले. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे उपाध्यक्ष श्री हनुमंत यादव, सचिव श्री आकाश भोसले, शहराध्यक्ष श्री संतोष घोरपडे, श्री हनुमंत तांबे, श्री व्यंकटेश पडिले, श्री अमोल साळुंके,श्री रामानंद माडेकर, विशाल पवार, बालाजी क्षीरसागर, श्री योगेश आतकरे,अॕड.श्री जयप्रकाश साळुंके इ. सह समितीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Related Posts

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    तुळजापूर तालुक्यातील बोगस खत प्रकरणी संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

    Spread the love

    Spread the loveशेतकरी पुत्र मनोज जाधव यांचे कृषी विभागाला निवेदन; पारदर्शक चौकशी व निलंबनाची मागणी धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे कथित बोगस खत विक्री प्रकरणी संबंधित दुकानदार व खत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *