जिल्हा परिषद अंतर्गत होणारी पदभरती NRHM च्या गाईडलाइन नुसार घेण्यात याव्यात

Spread the love

धाराशिव – शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांचे वतीने मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद धाराशिव यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत mpw पदभरती प्रक्रियेमध्ये I.S. कोर्स चे 50 टक्के मार्कस व बीएससीचे 20 टक्के मार्क ग्राह्य धरणे बाबत निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियान व वित्त आयोग अंतर्गत MPW (Male) ला कंत्राटी रिक्त पद भरती जाहिरात सन 2025-26 जाहिरात क्रमांक 1 दिनांक 03/06/ 2019 रोजी प्रसिद्ध करून दिनांक 24/06/2025 ते 08/08/2025 या कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात आले होते. नमूद जाहिरातीमध्ये MPW पदासाठी अट 12 वी सायन्स व सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अशी होती. दिनांक 09/10/2025 पात्र अपात्र यादीमध्ये NRHM गाईडलाईन नुसार असे सांगण्यात आले आहे की प्रत्येक उमेदवारासाठी इच्छित शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित वेटेज पॉईंट्स मोजले पाहिजेत.उदा.जर शैक्षणिक पात्रतेचा वेटेज पॉईंट 60 असतील आणि उमेदवाराला 70 टक्के गुण असतील तर ते 0.6070=42 होतात व अतिरिक्त शिक्षण असेल तर त्याची 20% मार्क ग्राह्य धरण्यात यावे. तरी दिनांक 02/03/2022 रोजी प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अंतर्गत शैक्षणिक अरतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या 70 टक्के गुण ग्राह्य धरून अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सन 2025- 26 ची mpw ची पदभरती करण्यात यावी व सदर केलेली पदभरती रद्द करण्यात यावी अन्यथा समितीच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवचे अॕडव्होकेट श्री संजय शिंदे, श्री सतीश मोहिते, श्री संतोष घोरपडे, रिक्षा समिती अध्यक्ष श्री वेंकटेश पडिले, धाराशिव तालुका उपाध्यक्ष श्री बबलू भोईटे, श्री अविनाश रणखांब, श्री दत्ता तुपे, श्री गणेश पवार, संजय यादव, विश्वंभर आगळे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Related Posts

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    तुळजापूर तालुक्यातील बोगस खत प्रकरणी संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

    Spread the love

    Spread the loveशेतकरी पुत्र मनोज जाधव यांचे कृषी विभागाला निवेदन; पारदर्शक चौकशी व निलंबनाची मागणी धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे कथित बोगस खत विक्री प्रकरणी संबंधित दुकानदार व खत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *