विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या School Bus चालक मालकांसाठी 23 नोव्हेंबर रोजी मार्गदर्शन कार्यशाळा

Spread the love

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज

नंदुरबार जिल्ह्यातील अमलीबार येथे शालेय विद्यार्थ्यांच्या बसला झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थ्यांचे निधन व अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टळावी,यासाठी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व स्कूलबस चालक व मालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा रविवार,दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता,उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,एमआयडीसी, प्लॉट नं. पी–18, धाराशिव येथे होणार आहे.

तरी सर्व स्कूलबस चालक–मालकांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

स्कूलबससाठी अनिवार्य पालन करावयाच्या उपाययोजना

वेग नियंत्रण यंत्रणा सुस्थितीत आहे का याची तपासणी,अग्नीशमन सिलेंडरची मुदत तपासणे व आवश्यक असल्यास रिफिलिंग करणे,प्रथमोपचार पेटीतील साहित्य पूर्ण आहे याची खात्री,वाहनाची वैध कागदपत्रे – इन्शुरन्स,योग्यता प्रमाणपत्र,पीयूसी,टॅक्स,परवाना तपासणी,चालकाकडे वैध अनुज्ञप्ती व बॅजची खात्री केली असावी.

विद्यार्थी सुरक्षेसाठी २१ नोव्हेंबरपासून स्कूलबस तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून कागदपत्रांची पूर्तता नसल्यास वाहन विद्यार्थी वाहतूक करू नये.नियमभंग आढळल्यास महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८८ अंतर्गत कारवाई केली जाईल,असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी,धाराशिव यांनी कळविले आहे.

  • Related Posts

    गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय ,सचिव भाग्यश्री पाटील

    Spread the love

    Spread the loveसामाजिक समता सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण धाराशिव -: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत…

    विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध विभागांच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज लेडीज क्लब, धाराशिव येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *