महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे आज (दि.१९)पासून निर्जलीकरण प्रशिक्षण

Spread the love

छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे बुधवार दि.१९ पासून पाच दिवस निर्जलीकरण (डिहायड्रेशन) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा युवक, युवती व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केले आहे.

या प्रशिक्षणात तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये निर्जलीकरण (डिहायड्रेशन) चे प्रकार, त्यामधील उद्योग संधी, व्हेजिटेबल कटिंग मशीन, ग्राइंडर मशीन, पॅकिंग, पिलिंग मशीन, प्रोसेस लाईन, सेटअप मशीन सिलेक्शन, कच्चा माल, बाजारपेठ, निर्यात क्षेत्रातील उद्योग संधी, मालाची क्वालिटी टेस्ट याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रात्यक्षिक प्रशिक्षणामध्ये मेथी पावडर, पालक पावडर, हिरवी मिरची पावडर, आले-लसूण पावडर, कढीपत्ता, पुदीना पावडर, बटाटा पावडर, चिकू फ्लेक्स, पायनॅपल फ्लेक्स तयार करणे यांचा समावेश आहे. या संधीचा स्वतःचा व्यवसाय करु इच्छिणाऱ्या युवक, युवती व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केले आहे.

प्रवेशासाठी व अधिक माहिती संपर्कः- श्रीमती आशा कुरवडे :७८८८०७०४१९, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, विभागीय कार्यालय, A-38, MIDC परिसर, रेल्वे स्टेशन रोड,छत्रपती संभाजीनगर.

  • Related Posts

    फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव :- लोकराजा,आरक्षणाचे जनक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर सेवा भावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन…

    गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय ,सचिव भाग्यश्री पाटील

    Spread the love

    Spread the loveसामाजिक समता सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण धाराशिव -: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *