
धाराशिव :- लोकराजा,आरक्षणाचे जनक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर सेवा भावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा, छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रतिमेस पुष्पहार व तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले, लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचे स्मरण करुन महापुरुषांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.यावेळी फुले शाहू आंबेडकर सेवा भावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष गणेश रानबा वाघमारे,सचिव प्रवीण जगताप उपाध्यक्ष संजय गजधने सहसचिव संग्राम बनसोडे,कोषाध्यक्ष अंकुश उबाळे, मार्गदर्शक सदस्य धनंजय वाघमारे, मार्गदर्शक सदस्य बलभीम कांबळे, मार्गदर्शक सदस्य संपतराव शिंदे, मार्गदर्शक सदस्य डॉ.रमेश कांबळे सह इतर उपस्थित होते.हा कार्यक्रम फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रम राबवित घेण्यात आला