गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय ,सचिव भाग्यश्री पाटील

Spread the love

सामाजिक समता सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण

धाराशिव -: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत गाडगे महाराज जयंतीचे 150 वे वर्ष तसेच महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन 8 ते 14 एप्रिल 2026 दरम्यान करण्यात आले आहे.या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह” अंतर्गत शासकीय स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम, शिबिरे व विविध विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी आज 9 एप्रिल रोजी येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विधी व सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती. भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले,समाज कल्याण अधिकारी सनम लामकाने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख हे प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयातील पायल अतुल नन्नावरे, आदित्य दीपक कदम, स्वप्नील माने, वैष्णवी बीडबाग, निशा खुडे आणि सुमीत सावंत या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत तसेच भारत सरकारच्या इतर शिष्यवृत्ती योजनांद्वारे प्रत्येकी 45 हजार रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. हे धनादेश श्रीमती. भाग्यश्री पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

श्रीमती भाग्यश्री पाटील यांनी विधी सेवा प्राधिकरणांतर्गत राबविण्यात येणाऱ्या लोकअदालत, मध्यस्थी केंद्र, बालस्नेही योजना, चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 व 15100 तसेच इतर विविध विधी सेवा योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच मोफत विधी सेवा सहाय हेल्पलाईन क्रमांक 15100 संदर्भातील जनजागृती करणाऱ्या भित्तीपत्रिकेचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.

  • Related Posts

    सोलापूरात ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ; ४९ ज्येष्ठ वकिलांचा सहभाग

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – दि. ३० जुलै : मुख्य मध्यस्थी देखरेख समिती, मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ४० तासांच्या मध्यस्थी…

    फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव :- लोकराजा,आरक्षणाचे जनक, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर सेवा भावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *