‘सेवा तीर्थ’मधून ‘नागरिक देवो भव’चा संदेश; पंतप्रधानांकडून चार मोठ्या योजनांना मंजुरी

Spread the love

नवी दिल्ली : ‘सेवा तीर्थ’ या संकल्पनेतून जनकल्याणाला प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब, वंचित, शेतकरी, युवा व महिला सक्षमीकरणाशी संबंधित महत्त्वाच्या योजनांवर कार्यारंभाच्या दिवशीच स्वाक्षरी केली. “नागरिक प्रथम” या भूमिकेतून घेतलेल्या या निर्णयांमुळे आरोग्य, कृषी, महिला स्वावलंबन आणि स्टार्टअप क्षेत्राला थेट बूस्टर डोस मिळणार आहे.
सरकारने ‘पीएम राहत (PM RAHAT)’ योजनेला मंजुरी देत अपघातग्रस्तांना ₹1.5 लाखांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘लखपती दीदी’ योजनेचे लक्ष्य दुप्पट करून 6 कोटी करण्यात आले आहे. स्वयंरोजगार व बचतगटांच्या माध्यमातून महिलांना थेट उत्पन्ननिर्मितीची संधी मिळणार असून ग्रामीण अर्थचक्राला गती मिळेल.

कृषी क्षेत्रासाठी कृषी पायाभूत सुविधा निधीचे लक्ष्य ₹1 लाख कोटींवरून ₹2 लाख कोटींवर वाढविण्यात आले आहे. यामुळे गोदामे, कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया केंद्रे यांसारख्या सुविधा उभारल्या जाणार असून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारमूल्य वाढण्यास मदत होईल.

याशिवाय Startup India अंतर्गत ‘स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0’ ला ₹10,000 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्स आणि डीप-टेक संशोधनासाठी हा निधी उपयोगी ठरणार आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *