धाराशिव प्रभाग-४ मध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई; घंटा गाडीही गायब — नागरिकांचा संताप उफाळला

Spread the love

धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नियमित नळपट्टी भरूनही पाणीपुरवठा बंद का आहे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. “आम्ही राजस्थानच्या वाळवंटात राहत नाही, मग पाणी का नाही?” असा रोष व्यक्त होत आहे.
पाणीटंचाईबरोबरच कचरा संकलनासाठी येणारी घंटा गाडीही परिसरात येत नसल्याची तक्रार आहे. “प्रभाग ४ मध्ये येण्यासाठी अटारी बॉर्डर आडवी आहे का?” असा उपरोधिक प्रश्न नागरिकांनी उपस्थित करत प्रशासनावर निशाणा साधला. केंद्रापासून राज्यापर्यंत सत्ता एकाच पक्षाची असताना मूलभूत सुविधा देण्यात विलंब का, असा सवालही करण्यात आला.
प्रशांत (बापू) साळुंके, सुधीर बंडगर, महेंद्र शिंदे, अजित बाकले यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा व घंटा गाडी नियमित सुरू करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सुविधा सुरू न केल्यास प्रभाग ४ मधील नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

  • Related Posts

    फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीकडून उपवर्गीकरण (अबकड) विरोधी मोर्चात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व जिल्हाधिकारी यांना निवेदन..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : आरक्षण उपवर्गीकरण (अबकड) विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात फुले,शाहू, आंबेडकर उद्यान कृती समितीने सक्रीय सहभाग घेतला.यावेळी समितीच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या…

    तुळजापूर तालुक्यातील बोगस खत प्रकरणी संबंधित कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

    Spread the love

    Spread the loveशेतकरी पुत्र मनोज जाधव यांचे कृषी विभागाला निवेदन; पारदर्शक चौकशी व निलंबनाची मागणी धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील अंदूर येथे कथित बोगस खत विक्री प्रकरणी संबंधित दुकानदार व खत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *