
धाराशिव – भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी नुकत्याच निवड झालेल्या दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा छत्रपती संभाजीनगर परिसरातील मित्र परिवार व नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार व सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी बोलताना दत्ताभाऊंनी आपल्या राजकीय प्रवासातील जुन्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांना भावनिक केले.
कार्यक्रमात बोलताना दत्ताभाऊ म्हणाले, “नेतृत्वाची जबाबदारी आणि जनतेचा सन्मान – ही दोन्ही गोष्टी मी मनापासून स्वीकारतो. ही केवळ पदाची निवड नाही, तर जनतेच्या विश्वासावर मिळालेली जबाबदारी आहे.”
या सत्कार सोहळ्यात परिसरातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. दत्ताभाऊंच्या मृदू स्वभाव, संयमित भाषाशैली आणि सातत्याने कार्यकर्त्यांत रमणं यामुळे त्यांचे सर्वत्र मोठे प्रेम व आदर आहे.
आपल्या भाषणाच्या शेवटी दत्ताभाऊ म्हणाले, “आपल्या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी मी मनापासून आभार मानतो. तुमचा हा विश्वास माझ्यासाठी प्रेरणादायी आहे आणि पुढील वाटचालीत माझे पाऊल अधिक ठामपणे पडेल याची हमी देतो.”
सत्कार समारंभात परिसरातील नागरिकांनी पुष्पगुच्छ, श्रीफळ व शाल देऊन दत्ताभाऊंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी त्यांच्यासोबत संवाद साधत मनमोकळ्या गप्पा मारल्या.