
धाराशिव – भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदाची धुरा दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. या निवडीबद्दल त्यांचा मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि मनःपूर्वक अभिनंदन केले.
या वेळी बोलताना मल्हार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, “दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या रूपाने पक्षाला एक सक्षम, कार्यतत्पर आणि अनुभवसंपन्न नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या निवडीमुळे धाराशिव जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट होईल, असा मला ठाम विश्वास आहे.”
दत्ताभाऊ कुलकर्णी हे अनेक वर्षांपासून पक्षात सक्रिय असून, त्यांनी विविध पदांवर काम करत कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. त्यांच्या संयमी आणि जनसंपर्कक्षम नेतृत्वामुळे भाजपला ग्रामीण भागातही नवसंजीवनी मिळेल, असे मत कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
या सत्कार सोहळ्यास भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण होते आणि भविष्यातील वाटचालीसाठी दत्ताभाऊ कुलकर्णी यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.