
तुळजापूर -: भवानी मातेचे दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून भाविक येत असतात. तेलंगणा मधील हैद्राबाद चे रहिवाशी असणारे भाविक के निर्मला रेड्डी यांनी श्रीतुळजाभवानी मातेसाठी 5 तोळ्यांचा सुवर्णहार अर्पण केला. कृतज्ञता म्हणून देवीचरणी उपहार अर्पण केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मंदिर संस्थान कडून त्यांचा देवीची प्रतिमा व महावस्त्रे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी गणेश निरवळ, दिनेश निकवाडे हे उपस्थित होते.