धाराशिव भाजप जिल्हाध्यक्षपदी दत्ता (भाऊ ) कुलकर्णी

Spread the love

धाराशिव – भारतीय जनता पक्षाने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक मजबुतीवर भर देत जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा दत्ताभाऊ कुलकर्णी यांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी अधिकृत घोषणा करत ही माहिती दिली. कुलकर्णी यांनी २०१६ ते २०१९ या कालावधीतही जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती. त्यांच्या कार्यकाळात भाजपने विविध निवडणुकांमध्ये भक्कम यश संपादन केले होते. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्येही पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल, अशी पक्षांतर्गत आशा व्यक्त केली जात आहे. दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार बसवराज पाटील या तिन्ही नेत्यांशी विश्वासाचे संबंध असून, पक्षातील विविध स्तरांमध्ये समन्वय राखण्याची त्यांची खास शैली आहे. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद, तसेच निवडणूक नियोजन या क्षेत्रांतील त्यांचा अनुभव पक्षासाठी मोलाचा ठरणार आहे. राजकारणाबरोबरच सहकार व उद्योग क्षेत्रातही त्यांचे कार्य लक्षणीय आहे. सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक असलेल्या कुलकर्णी यांचे दोन गूळ पावडर कारखाने आणि दहा शाखांची मल्टीस्टेट बँक सध्या यशस्वीरित्या कार्यरत आहे. भाजपच्या जिल्ह्यातील संघटनात्मक विस्तारासाठी त्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अनुभव निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक सुसंघटित व प्रभावी होईल, अशी अपेक्षा भाजपच्या वर्तुळात निर्माण झाली आहे.

  • Related Posts

    मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सतीशकुमार पाटील,कार्याध्यक्ष विजयकुमार पवार

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) -: मराठा सेवा संघाची नूतन जिल्हा कार्यकारिणी शनिवारी सकाळी झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी सतीशकुमार पाटील यांची तर कार्याध्यक्षपदी विजयकुमार पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात…

    सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत दत्तात्रय आनंदे यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव

    Spread the love

    Spread the loveमुंबई – राज्यभरातील पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवेबद्दल ओळखले जाणारे एक नाव म्हणजे श्री. सूर्यकांत दत्तात्रय आनंदे. त्यांच्याच प्रदीर्घ सेवेला आज राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, राष्ट्रपती…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *