Spread the love

शौकत शेख यांची शिवसेना (ठाकरे) धाराशिव-कळंब विधानसभा अध्यक्षपदी निवड

धाराशिव दि.13 (प्रतिनिधी) – शहरातील शौकत नरुद्दीन शेख यांची शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या धाराशिव – कळंब विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचाराने प्रेरित होऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील, संपर्कप्रमुख सुनील काटमोरे व सह संपर्कप्रमुख मकरंद उर्फ नंदू भैया राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शौकत नरुद्दीन शेख यांची धाराशिव – कळंब विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शेख यांनी शिवसेना पक्षाची ध्येय धोरणे, पक्ष वाढीसाठी सर्वसामान्यांच्या न्याय विकासासाठी सदैव काम करीत रहावे. पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी दीपक जाधव, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, राणा बनसोडे, नाना घाटगे, अफरोज पिरजादे, अबरार कुरेशी, तोफिक पठाण, शाखाप्रमुख सादिक सय्यद (छोटा साजिद भावी नगरसेवक), परवेज काझी, संकेत सुर्यवंशी, हशमोद्दीन काझी, आयाज काझी, शाकीर शेख, मिलिंद पेठे, इम्तियाज बागवान, साबेर सय्यद, मुजीब काझी, गफार भाई, मोईन पठाण, शहबाज पठाण, कलीम कुरेशी आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्दल शेख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  • Related Posts

    सिव्हिल इंजिनिअर्स संघटना – अध्यक्षपदी राहुल गवळी तर सचिव पदी प्रदीप रोंगे बिनविरोध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड सिव्हिल इंजिनिअर्स धाराशिवच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया बिनविरोध सर्वानुमते पार पडली. यामध्ये सर्व सदस्यांच्या एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.…

    संभाजी ब्रिगेड धाराशिव तालुकाध्यक्ष मनोज मोरे यांची नियुक्ती…

    Spread the love

    Spread the loveसंभाजी ब्रिगेड धाराशिव तालुकाध्यक्ष मनोज मोरे यांची नियुक्ती… धाराशिव (प्रतिनिधी )सामाजिक व संघटनात्मक पातळीवर कार्यरत असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या धाराशिव तालुकाध्यक्ष मनोज मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *