एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती

Spread the love

मुंबई: एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार हि नियुक्ती करण्यात आली आहे.
सन. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी महामंडळ) स्थापना करण्यात आली. र.गो.सरैय्या हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तीनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद भूषविले आहे. प्रताप सरनाईक हे एसटी महामंडळाचे २६ वे अध्यक्ष असणारं आहेत.
महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची ” लोकवाहिनी ” असलेल्या एसटीला भविष्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. तसेच आपल्याला या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

  • Related Posts

    सिव्हिल इंजिनिअर्स संघटना – अध्यक्षपदी राहुल गवळी तर सचिव पदी प्रदीप रोंगे बिनविरोध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड सिव्हिल इंजिनिअर्स धाराशिवच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया बिनविरोध सर्वानुमते पार पडली. यामध्ये सर्व सदस्यांच्या एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.…

    संभाजी ब्रिगेड धाराशिव तालुकाध्यक्ष मनोज मोरे यांची नियुक्ती…

    Spread the love

    Spread the loveसंभाजी ब्रिगेड धाराशिव तालुकाध्यक्ष मनोज मोरे यांची नियुक्ती… धाराशिव (प्रतिनिधी )सामाजिक व संघटनात्मक पातळीवर कार्यरत असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या धाराशिव तालुकाध्यक्ष मनोज मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *