धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा संपन्न

Spread the love

धाराशिव –  दिनांक ०१ एप्रिल रोजी धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा धाराशिव जिल्हा न्यायालय येथील सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी जिल्हा विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद जोशी यांनी ॲडव्होकेट अमोल वरुडकर यांच्याकडे नूतन जिल्हा विधीज्ञ मंडळाचा अध्यक्ष पदाचा पदभार सोपविला असून जिल्हा विविध मंडळाच्या नूतन अध्यक्ष पदाचा पदभार ॲडव्होकेट अमोल वरुडकर यांनी स्वीकारला असून यासोबतच उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट नितीन लोमटे व ॲडव्होकेट प्रमोद वाकुरे, तर कोषाध्यक्षपदी ॲडव्होकेट एन डी पाटील, सचिव पदी ॲडव्होकेट अनिकेत देशमुख, सहसचिव पदी ॲडव्होकेट भाग्यश्री रणखांब व महिला प्रतिनिधी म्हणून ॲडव्होकेट उज्वला इंगळे यांनी पदभार स्वीकारला आहे याप्रसंगी नूतन कार्यकारणीचा माजी जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद जोशी व कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे माजी सदस्य ॲडव्होकेट मिलिंद पाटील यांनीही यावेळी नूतन कार्यकारणीचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या या पदग्रहण समारंभास जिल्ह्यातील वकील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

  • Related Posts

    मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सतीशकुमार पाटील,कार्याध्यक्ष विजयकुमार पवार

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) -: मराठा सेवा संघाची नूतन जिल्हा कार्यकारिणी शनिवारी सकाळी झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी सतीशकुमार पाटील यांची तर कार्याध्यक्षपदी विजयकुमार पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात…

    सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत दत्तात्रय आनंदे यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव

    Spread the love

    Spread the loveमुंबई – राज्यभरातील पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवेबद्दल ओळखले जाणारे एक नाव म्हणजे श्री. सूर्यकांत दत्तात्रय आनंदे. त्यांच्याच प्रदीर्घ सेवेला आज राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, राष्ट्रपती…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *