दलित वस्तीचा निधी दलित वस्तीतच खर्च करा‌ॲड.गोरक्ष लोखंडे

Spread the love

धाराशिव नगर परिषदेचा आढावा

धाराशिव – दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मिळणारा निधी हा केवळ दलित वस्तीतच खर्च होण्याची आवश्यकता असून, त्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी.असे निर्देश अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य ॲड.गोरक्ष लोखंडे यांनी दिले.

आज ३ फेब्रुवारी रोजी शिंगोली विश्रामगृह धाराशिव येथे नगर परिषद धाराशिवच्या दलित वस्तीच्या विकासकामांच्या खर्चाबाबत,लाड पागे समिती व अनुकंपा नियुक्तीबाबत आढावा घेतांना आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत व धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री.लोखंडे म्हणाले,दलित वस्त्यांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत का याचा आढावा यावेळी घेण्यात आला.काही ठिकाणी अद्याप पाणीपुरवठा, स्वच्छता,रस्ते,गटार यासारख्या सुविधा पुरेशा प्रमाणात नसल्याचे भेटीदरम्यान निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.या समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आयोगाचे दलित वस्ती सुधार योजनेसाठी मिळणाऱ्या निधीच्या वापराबाबत विशेष लक्ष असल्याचे सांगून श्री.लोखंडे म्हणाले,काही भागांमध्ये हा निधी इतर कामांसाठी वापरण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.हा निधी मूळ उद्देशानुसार केवळ दलित वस्तीतच वापरण्यात यावा,असे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी दिले.

निधीचा योग्य वापर करण्यात येत आहे.मात्र, काही ठिकाणी मंजुरी प्रक्रियेमध्ये विलंब होत असल्याचे श्रीमती फड यांनी सांगितले.

आयोगाच्या सदस्यांनी या समस्या गांभीर्याने घेतल्या आणि येत्या काही महिन्यांत पुन्हा दौरा करून कामांची पाहणी केली जाईल,असे सांगितले. तसेच,नगर परिषदेला दलित वस्त्यांसाठी विशेष कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.

  • Related Posts

    सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा…

    ‘पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बीबीएफ यंत्र चालवत केली सोयाबीन पेरणी,तूरही टोकण पद्धतीने लावली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *