४ फेब्रुवारीपासून कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

Spread the love

धाराशिव – ०४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार ०४ फेब्रुवारी २०२५ हा दिवस”United by Unique “या थीमवर आधारित आहे.

या दिनाच्या अनुषंगाने राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थिती श्री.एकनाथ शिंदे व श्री. अजित पवार उपमुख्यमंत्री,श्री. प्रकाश आबिटकर,सार्वजनिक आरोग्य मंत्री,श्रीमती मेघना बोर्डीकर – साकोरे,राज्यमंत्री,सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे.

या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये करण्यात येणार आहे.जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्व आरोग्य संस्थांनी आपल्या संस्थांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे
४ ते ८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान जिल्ह्यातील आतापर्यंत निदान झालेल्या सर्व कर्करोग रुग्णांना संदर्भ सेवा व विनामूल्य औषध उपचार मिळण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

९ फेब्रुवारी रोजी कर्करोग निदान वाहनांचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथज शिंदे,आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर,सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर – साकोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.

९ ते १६ फेब्रुवारीदरम्यान उपजिल्हा, स्त्री रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम व संशयित रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.१७ ते २४ फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यातील संशयित सर्व कर्करोग रुग्णांना आवश्यक ते पुढील तपासणी आणि निदानासाठी आपल्या जवळच्या उपजिल्हा / ग्रामीण / स्त्री रुग्णालय येथे संदर्भित करून आवश्यक ते औषधोपचार देण्यात येणार आहे.२५ फेब्रुवारी रोजी संशयित रुग्णांपैकी ज्या रुग्णांचे कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णांना जवळच्या कर्करोग उपचार केंद्रावर संदर्भित करून त्यांना उपचाराखाली घेण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव सभागृह येथे करण्यात येणार आहे.

तरी ही मोहिम महाराष्ट्रभर ऑनलाईन प्रक्षेपणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये थेट प्रसारित केली जाणार आहे.४ फेब्रुवारी २०२५ पासून संपूर्ण राज्यभर जनजागृती आणि कर्करोग तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.या उपक्रमात आरोग्य संस्था,सामाजिक संघटना आणि स्थानिक प्रतिनिधी यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. तसेच या कर्करोग तपासणी शिबाराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी केले आहे.

  • Related Posts

    सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा…

    ‘पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बीबीएफ यंत्र चालवत केली सोयाबीन पेरणी,तूरही टोकण पद्धतीने लावली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *