अणदूर येथे कॅनल दुरुस्तीचे निकृष्ट काम; पाण्याची गळती होण्याची शक्यता

Spread the love

तुळजापूर: तालुक्यातील अणदूर येथील बाळूबाई साठवण तलाव ते फुलवाडीकडे जाणाऱ्या कॅनलच्या दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे. केवळ मुरूम टाकून दुरुस्ती सुरू असल्याने पाण्याची गळती होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

लवकरच उन्हाळा सुरू होणार असताना ही दुर्दशा ग्रामस्थांसाठी अडचणीची ठरणार आहे. या कामामुळे चिवरी पाटी आणि वत्सला नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पाझरणार असल्याचा आरोप केला जात आहे. दुरुस्तीच्या नावाखाली केवळ आर्थिक लूट सुरू असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, या कॅनलमधून वाहणारे पाणी माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या शेतीसाठी उपयोगी पडणार असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेबाबत अधिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

  • Related Posts

    सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा…

    ‘पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बीबीएफ यंत्र चालवत केली सोयाबीन पेरणी,तूरही टोकण पद्धतीने लावली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *