संभाजी ब्रिगेडच्या वतीने बार्शीतील राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Spread the love

सोलापूर /बार्शी : संभाजी ब्रिगेडच्या वतीने बार्शीतील राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे बार्शी तालुकाध्यक्ष आनंद काशीद यांनी मार्गदर्शन केले.

आपल्या भाषणात आनंद काशीद म्हणाले, “आजच्या काळात महिलांनी आणि मुलींनी सक्षम व निर्भय होणे अत्यंत आवश्यक आहे. जिजाऊ मा साहेबांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने संकटांवर मात करण्याची ताकद निर्माण केली पाहिजे. जिजाऊंसारख्या स्त्रियांच्या आदर्शांवर चालल्यास कोणत्याही अडचणींवर मात करणे शक्य आहे. महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणे गरजेचे आहे.”

या जिजाऊ पूजनाच्या वेळी विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष पांडुरंग घोलप, विक्रम बापू घाईतिडक, रणजीत पाटील, मनोज शिंदे, गणेश भोसले, राजवीर काशीद, रणवीर काशीद यांच्यासह अनेक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाने एकता, प्रेरणा, आणि जिजाऊंच्या विचारांचा प्रसार यांना महत्त्व दिले.

  • Related Posts

    छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

    धाराशिव – वीररत्न शिवाजी काशीद व जिवाजी महाले प्रतिष्ठान उपळे (मा) ता.जि. धाराशिव यांच्यावतीने वीररत्न शिवाजी काशीद यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली.

    Spread the love

    Spread the loveतसेच शिवा काशिद जयंती निमित्त व गयाबाई श्रीमंत पवार यांच्या स्मरणार्थ स्वधार मतिमंद मुलीचे बालग्रह येथे फळ वाटप करण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *