संविधान उद्देशिका वाचन करुन शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीची सुरुवात

Spread the love

धाराशिव :- छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यात सामाजिक समता न्याय दिन साजरा केला जातो,या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद धाराशिव,समाज कल्याण विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,जिल्हा परिषद मल्टीपर्पज शाळा येथुन व्यसनमुक्ती,नशा मुक्त भारत जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली,या रॅलीची सुरुवात छत्रपती राजर्षी शाहू महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करुन करण्यात आली,जिथे जाचाल तिथे वाचाल भारतीय संविधान या सदराखाली मतदार जनजागरण समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा म्हाडाळकर व सहाय्यक कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांना भारतीय संविधान उद्देशिका विश्लेषण प्रत देऊन मतदार जनजागरण समितीच्या वतीने राबविण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाविषयी माहिती गणेश वाघमारे यांनी दिली.यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाचे आयुक्त सचिन कवले,विस्तार अधिकारी भारत देवगुडे,व्यसनमुक्ती चळवळीचे डॉ.संदिप तांबारे,तसेच मतदार जनजागरण समितीचे सचिव अब्दुल लतीफ,कार्याध्यक्ष गणेश रानबा वाघमारे,कोषाध्यक्ष बाबासाहेब गुळीग,आनंद वीर सर,राजेंद्र धावारे सर,समाज कल्याणचे कपील थोरात,श्री गुरव, संकेत भोसले,प्रविण कातंगले,रजियोद्दीन काझी,सहभागी झालेल्या शाळाचे मुख्याध्यापक,शिक्षक,सह इतर मान्यवर विद्यार्थी उपस्थित होते

  • Related Posts

    क्रांतिसूर्य अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनविण्याचा ध्यास घेतलेल्या क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याला त्यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त धाराशिव येथील…

    छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *