जागतिक पर्यावरण दिन : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे वृक्षारोपण व निसर्ग संवर्धनाचा संदेश

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी ) – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांच्या वतीने आज ५ जून,२०२६ रोजी न्यायिक अधिकारी निवासस्थान परिसर,धाराशिव येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत विविध सामाजिक व पर्यावरणपूरक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.याच परंपरेला अनुसरून या वर्षीही भव्य वृक्षारोपण मोहीम राबवून विविध झाडे लावण्यात आली.तसेच उपस्थितांना व नागरिकांना मानवी जीवनातील झाडांचे महत्त्व आणि निसर्ग संवर्धनाची गरज याविषयी सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिश्री देव यांच्या हस्ते रोपटे लावून करण्यात आली.या प्रसंगी ए.एस.आवटे,जिल्हा न्यायाधीश आर.के.खोमणे,जिल्हा न्यायाधीश,एन.एल.येवलेकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश उस्मानाबाद,विश्वास करे, विभागीय वन अधिकारी,धाराशिव, भाग्यश्री पाटील,सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, उस्मानाबाद,दिपक गांधले,वन परीक्षेत्र अधिकारी,धाराशिव, पी.व्ही.मेढे,मुख्य न्यायदंडाधिकारी,उस्मानाबाद, एस.एस.पाटील,सहदिवाणी न्यायाधीश व वरिष्ठ स्तर, उस्मानाबाद,तसेच एस.एस. पाटील,७ वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर,उस्मानाबाद यांची प्रमुख उपस्थिती होती.

वृक्षारोपण कार्यक्रमात जिल्हा न्यायालयातील कर्मचारी,विद्युत आणि वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.सर्वांनी मिळून पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

  • Related Posts

    सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा…

    ‘पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बीबीएफ यंत्र चालवत केली सोयाबीन पेरणी,तूरही टोकण पद्धतीने लावली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *