तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या 10 जणांवर दंडात्मक कारवाई

Spread the love

तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मंदिर परिसरात थुंकताना आढळलेल्या १० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकांनी मंदिर परिसरात गस्त घालत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली. संबंधित १० जणांकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे एकूण ५,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर आणि पवित्र राखण्याच्या उद्देशाने मंदिर प्रशासनाने थुंकणे, घाण करणे तसेच कचरा टाकणे याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने मंदिर संस्थानच्या सहायक स्वच्छता निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके कार्यरत असून ती दररोज मंदिर परिसरात पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.

श्री आई तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिर परिसरात स्वच्छता राखावी, कचरा कचरापेटीतच टाकावा तसेच परिसरात कोठेही थुंकू नये, असे आवाहन श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Related Posts

    क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग…

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *