धाराशिव ध्वजदिन निधी संकलनात राज्यात तिसरे ; उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान

Spread the love

धाराशिव – सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ निमित्त निधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी करत धाराशिव जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पालकमंत्री श्री.प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते १ मे रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.७ डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून पाळण्यात येतो.या निमित्ताने दरवर्षी ७ डिसेंबरपासून पुढील वर्षाच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत निधी संकलन मोहीम राबविण्यात येते.ध्वजदिन निधी-२०२४ साठी महाराष्ट्र शासनाकडून धाराशिव जिल्ह्यास ५७ लक्ष रुपये इतके उद्दिष्ट देण्यात आले होते.

मात्र जिल्ह्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच विविध संस्थांच्या सक्रिय सहकार्यामुळे हे उद्दिष्ट केवळ पूर्णच झाले नाही,तर त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक निधी संकलित करण्यात आला.एकूण १ कोटी ३४ हजार ८४ हजार रुपये इतका निधी जमा करण्यात आला असून, हे प्रमाण दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल २३६.५६ टक्के इतके आहे.

या उल्लेखनीय यशामुळे जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.या पार्श्वभूमीवर १ मे २०२६ रोजी झालेल्या कार्यक्रमात संचालक,सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य,पुणे यांचेकडून प्राप्त स्मृतिचिन्ह जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना प्रदान करण्यात आले.

या सन्मानामुळे जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग,अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव झाला असून,देशसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या उपक्रमात धाराशिवने उंच भरारी घेतली आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *