फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सम्राट अशोकांच्या कलिंग युद्ध देखावा, रक्तदान शिबीर सह विविध सामाजिक उपक्रम राबवुन महामानवाला अभिवादन.

Spread the love

धाराशिव :- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कलिंग युद्धाचा भव्य देखावा सादर करण्यात आला.या देखाव्याला जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक रितु खोखर,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,आरडीसी विद्याचरण कडवडकर,तहसिलदार मृणाल जाधव,नायाब तहसिलदार महादेव शिंदे,समाज कल्याण सहआयुक्त सचिन कवले,मुख्याधिकारी निता अंधारे,यांनी संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली,त्यानंतर भारताचा बादशहा चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कलिंग युद्धावर आधारित सादर केलेल्या देखाव्याची पाहणी करण्यात आली,रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांचा सन्मान जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला,तसेच पर्यटन विकास समितीचे मार्गदर्शक डॉ.अभय शहापुरकर,अध्यक्ष युवराज नळे, सहसचिव अब्दुल लतीफ,राजाभाऊ कारंडे,ॲड.व्यकंट गुंड,भाजपा युवा नेते मल्हार पाटील,जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,नगराध्यक्ष नेहाताई काकडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे,विद्या माने,नगर सेवक अमित शिंदे,राहुल काकडे,सिध्दार्थ बनसोडे,दत्ता पेठे सह इतर नगरसेवक,राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे,जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील,नगर सेवक खलिफा कुरेशी,डॉ.आविनाश तांबारे,श्री साई श्रद्धा एज्युकेशन सोसायटीचे सोमनाथ लांडगे,अंकुर शिशुगृह तथा अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष फेरोज पल्ला,गजानन पाटील,अनंत जगताप,जयंत देशमुख,बाळासाहेब सुभेदार,पत्रकार बांधव यांच्या सह इतर मान्यवरांनी महामानवाला अभिवादन करून देखाव्याची पाहणी केली,सादर करण्यात आलेल्या या देखाव्यात सम्राट अशोक यांच्या जीवनातील कलिंग युद्धाचे जिवंत चित्रण करण्यात आले. युद्धानंतर झालेला त्यांच्या मनोवृत्तीतील बदल आणि बौद्ध धर्माचा स्वीकार याचे प्रभावी सादरीकरण उपस्थितांना भावले.तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आलेल्या भीम अनुयायासाठी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली होती,राजगीर संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले,यावेळी अध्यक्ष गणेश वाघमारे यांनी मान्यवरांना देखाव्याबाबत सविस्तर माहिती देत उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.समाजामध्ये इतिहासाची जाणीव,सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव रुजविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.या सर्व उपक्रमांसाठी नगर परिषदे सह मोलाचे सहकार्य लाभले. मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जात असल्याचे मत व्यक्त केले, समिती अध्यक्ष गणेश रानबा वाघमारे, सचिव प्रवीण जगताप उपाध्यक्ष संजय गजधने, सहसचिव संग्राम बनसोडे,कोषाध्यक्ष अंकुश उबाळे, मार्गदर्शक सदस्य बलभीम कांबळे, धनंजय वाघमारे, संपतराव शिंदे,बाबासाहेब देविदास बनसोडे,किसन घरबुडवे,रमेश कांबळे,स्वराज जानराव, विशाल घरबुडवे,बाबासाहेब गुळीग,अतुल लष्करे,विवेक यादव,विजय राठोड, सरफराज पटेल,महादेव एडके,बाळु कांबळे,युसुफ सय्यद,गोविंद वारे,गरड, रमेश बनसोडे, मुकेश मोटे,देखावा बनविणारे शशी माने विशाल सरवदे शिवलिंग लोंढे अजय चिलवंत सह इतर तर समितीच्या वतीने दरवर्षी स्थानिक पातळीवर कार्यक्रम घेण्यात येतात यावर्षी स्वच्छता अभियान,नारी सन्मान,भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जनजागृती व्याख्याते,शासकीय सेवेत रुजू झालेले विद्यार्थी व इतर गुणवंतांचा सत्कार,शासकीय योजनांचा माहिती मेळावा,दिव्यांग बांधवासाठी मेळावा व आरोग्य शिबिर,शासकीय योजनांचा माहिती मेळाव्यात विविध शासकीय कार्यालयाचे स्टॉल लावण्यात आले होते,दिव्याग बांधवांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला,भोजन दान, रक्तदान शिबीर,आकर्षक अशा देखाव्याचे सादरीकरण सह ऐनवेळी सुचविलेले सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले.समितीचे पदाधिकारी यासाठी अहोरात्र कष्ट करतात अशी माहिती समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे यांनी दिली व आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.

  • Related Posts

    महामानवाचा महा जयंती महोत्सवातील शासकीय योजनांचा माहिती मेळाव्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाचा महा जयंती महोत्सवात शासकीय योजनांचा माहिती मेळावा व दिव्यांग बांधवासाठी मेळावा,आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते,या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी…

    फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाचा महा जयंती महोत्सवात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव :- फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाचा महा जयंती महोत्सव साजरा करण्यात येत असुन आज रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *