डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक

Spread the love

डी. एस. ग्रुपच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

धाराशिव, – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात मध्यवर्ती जयंती समारोह समिती व डी. एस. ग्रुपच्यावतीने दि.22 एप्रिल बुधवारी सायंकाळी 4 वाजता मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भीम अनुयायी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांनी केले आहे.

बुधवारी सायंकाळी 4 वाजता शहरातील भीमनगर येथील क्रांती चौकातून मिरवणूक सेाहळ्यास प्रारंभ होणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन मराठायोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून सौंदाळाचे सरपंच शरदराव आरगडे पाटील, विशाल शिंगाडे (कोषाध्यक्ष), आणि प्रविण सूर्यवंशी (अध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

ही मिरवणूक रथयात्रा भीम नगर, क्रांती चौक, भीम जयंतीनिमित्त होणार्‍या या भव्य आयोजनामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरवणूक व सामाजिक उपक्रमांत सर्व भीमप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मार्गदर्शक धनंजय शिंगाडे, विशाल शिंगाडे यांनी केले आहे.

  • Related Posts

    संविधान उद्देशिका वाचन करुन शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीची सुरुवात

    Spread the love

    Spread the love धाराशिव :- छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यात सामाजिक समता न्याय दिन साजरा केला जातो,या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद धाराशिव,समाज कल्याण विभाग धाराशिव यांच्या…

    छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *