महामानवाचा महा जयंती महोत्सवातील शासकीय योजनांचा माहिती मेळाव्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

Spread the love

धाराशिव:- फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाचा महा जयंती महोत्सवात शासकीय योजनांचा माहिती मेळावा व दिव्यांग बांधवासाठी मेळावा,आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते,या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ प्रियंवदा महाडदळकर,अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान,तहसिलदार मृणाल जाधव,नायाब तहसिलदार महादेव शिंदे,यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करण्यात आले,या मेळाव्यात नगर परिषद विभाग, तहसिल कार्यालय,दिव्यांग सक्षमीकरण विभाग,बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,कृषी विभाग,रोहिदास विकास महामंडळ,पंचायत समिती विभाग,एस टी महामंडळ,विधी सेवा प्राधिकरण विभाग,सह इतर शासकीय कार्यालये सहभागी झाले होते,तर दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.आलेल्या मान्यवरांचा सत्कार समितीच्या वतीने शाल व गुलाब पुष्प देऊन केला.धाराशिल सेवक म्हणून कार्य करणारे विवेक यादव,विजय राठोड यांचा सत्कार जिल्हाधिकारी सिईओ यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,सिईओ प्रियंवदा महाडदळकर,अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान,तहसिलदार मृणाल जाधव, नायाब तहसिलदार महादेव शिंदे, रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतीफ,प्रहार संघटनेचे मयुर काकडे,विठ्ठल गायकवाड, फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे, सचिव प्रविण जगताप, उपाध्यक्ष संजय गजधने,संग्राम बनसोडे,धनंजय वाघमारे,अंकुश उबाळे,बलभीम कांबळे,बाबासाहेब गुळीग,स्वराज जानराव,विशाल घरबुडवे,रमेश कांबळे,बाबासाहेब बनसोडे,ॲड.अनुरथ नागटिळक,आल्टे,रमेश पाटील,किसन घरबुडवे,अतुल लष्करे,विवेक यादव, विजय राठोड,डॉ.चौरे,सिध्दार्थ जानराव, सतिश होटकर,तेजस्विनी पंके,संगिता शिंदे, युसुफ शेख, सतिश सांगळे,उल्हास झेंडे,वैभव गोरे,ॲड.लक्ष्मीकांत कुलकर्णी,प्रशांत मते,एन एम काझी,हणुमंत क्षिरसागर, मुकेश मोटे, संतोष कार्लेकर,शशी माने,विशाल सरवदे, शिवलिंग लोंढे,अजय चिलवंत,सह इतर मान्यवर उपस्थित होते.उद्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन, रक्तदान शिबीर व भोजन दान व इतर कार्यक्रम आयोजित केले आहेत असे समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे यांनी सांगितले.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *