शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वार्डाची सुरक्षा समिती सदस्यांकडून पाहणी.

Spread the love

धाराशिव : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धाराशिव येथे उष्माघात वार्ड पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आला आहे. रुग्णांना तातडीने व योग्य उपचार मिळावेत यासाठी रुग्णालय प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरक्षा समिती सदस्यांनी उष्माघात वार्डाला भेट देऊन पाहणी केली. वार्डातील उपचार व्यवस्था, उपलब्ध

बेड,औषधसाठा, शीतकरण सुविधा तसेच रुग्णसेवेचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षमपणे कार्यरत ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली उष्माघातग्रस्त रुग्णांवर योग्य उपचार सुरू असून,अधिक्षक डॉ. तानाजी लाकाळ यांचे या व्यवस्थेवर विशेष लक्ष आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स व आरोग्य कर्मचारी दक्षतेने सेवा बजावत आहेत.धाराशिवसह नाशिक, सोलापूर, बार्शी व इतर भागांतील अनेक रुग्णांनी येथे उपचार घेतले असून, योग्य वैद्यकीय सेवेमुळे अनेक जण सुखरूपपणे घरी परतले आहेत.त्यामुळे वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव येथील ही आरोग्य यंत्रणा नागरिकांसाठी

दिलासादायक ठरत आहे, सुरक्षा समिती अध्यक्ष तथा जैविक शास्त्र तज्ञ डॉ विश्वजीत पवार यांनी नागरिकांना आवाहन केले की,उन्हाळ्यात काळजी घ्या,भर उन्हात बाहेर पडताना डोक्यावर टोपी,अंगावर हलके कपडे,पुरेसे पाणी आणि उन्हापासून बचावाची काळजी घ्यावी,पाहणी करताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव सुरक्षा समिती सदस्य अब्दुल लतीफ, गणेश वाघमारे,सुरक्षा गार्ड सुपर वायझर बाबासाहेब जावळे, परिचारिका शिंगाडे सह इतर उपस्थित होते.

  • Related Posts

    तापाचा वाढता धोका ; जिल्ह्यात ‘आरोग्य अलर्ट’

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्ह्यात सध्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.वाढत्या तापाच्या रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियासह अन्य कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिक,शाळा- महाविद्यालये आणि…

    नेत्रदानाचा संदेश घेऊन धाराशिव येथे जनजागरण रॅली४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त उपक्रम ; विद्यार्थी,शिक्षकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – नेत्रदानातून गरजूंच्या आयुष्यात दृष्टीचा प्रकाश निर्माण होऊ शकतो,’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी आज ४ सप्टेंबर रोजी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *