आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताहानिमित्त सहकार विभागाच्या वतीने रूपामाता ईरा स्कूलमध्ये वृक्षारोपण.

Spread the love

धाराशिव ( प्रतिनिधी ) – केंद्रीय सहकार मंत्रालय व सहकार विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह–२०२६ निमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, धाराशिव, जिल्हा सहकार बोर्ड मर्यादित, धाराशिव तसेच रूपामाता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने रूपामाता ईरा इंटरनॅशनल स्कूल, सांजा रोड, धाराशिव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपनिबंधक मा. श्री. पांडुरंग साठे, रूपामाता परिवाराचे संस्थापक अॅड. व्यंकट गुंड पाटील, सहाय्यक निबंधक श्री. अरुण शेंदारकर, सहाय्यक निबंधक श्री. ए. आर. सय्यद, कार्यालय अधीक्षक श्री. डी. एस. जाधव, जिल्हा सहकार विकास अधिकारी श्री. मधुकर जाधव, रूपामाता मल्टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद खांडेकर, रूपामाता अर्बनचे मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. विशाल गुंड पाटील, रूपामाता ईरा इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सर्वपल्ली अरुण कुमार, रुपामाता प्राथमिक चे मुख्याध्यापक श्री. विजय पिंपळकर, हेड मँनेजर श्री. अजयसिंह ठाकूर तसेच रूपामाता फाऊंडेशनचे समन्वयक श्री. गजानन पाटील, यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

यावेळी मान्यवरांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन करण्याचीही गरज अधोरेखित केली. सहकार चळवळीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

या कार्यक्रमास सहकार विभागातील अधिकारी व कर्मचारी, रूपामाता परिवाराचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.

  • Related Posts

    ‘महा वॉकॅथॉन – वॉक फॉर वॉटर’मधून जलसंधारणाचा संदेश

    Spread the love

    Spread the loveपाणी व माती संवर्धनासाठी धाराशिवकरांची एकजूट ; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग धाराशिव – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करण्यात आला.पाणी…

    भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन जिल्हा वैद्यकीय पतसंस्थेंच्या वतीने रुग्णांसाठी बाकड्याचे अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान यांच्या हस्ते लोकार्पण..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव :- 80 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दि.15 ऑगस्ट रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय रूग्णालय पतसंस्था यांनी सुरक्षा समितीच्या विनंतीला मान देऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी सिमेंटच्या बाकड्याची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *