पाण्याचे नियोजन आणि लोकसहभागातूनच जिल्हा समृद्धीचा मार्ग,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारजागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळा संपन्न

Spread the love

धाराशिव -: जिल्ह्यात जलसंधारण व जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून “जिथे पाणी वाढते, तेथे समृद्धी वाढते” याच्या अनुषंगाने व्यापक विचारमंथन होणे आवश्यक आहे. पाण्याचे योग्य नियोजन व लोकसभागातून जिल्हा जलसमृद्ध होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

मृदा व जलसंधारण विभाग, धाराशिव व मृदा व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे संपूर्णतः अभियान २.० अंतर्गत आयोजित जागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून श्री.पुजार बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जल योद्धा हनुमंत केंद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, धाराशिव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.मदने, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रभाकर महामुनी, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी चंद्रकांत राऊळ, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कटकधोंड, धाराशिव सारथी जिल्हा परिषद शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विकास गोडसे व स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या मार्गदर्शक श्रीमती वैशाली घुगे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार पुढे म्हणाले की, पाण्याचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने आपल्या स्तरावर नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. पूर्वी महिलांना डोक्यावर हंडा घेऊन दूरवरून पाणी आणावे लागत होते, मात्र आज ‘हर घर जल’ योजनेमुळे अनेक गावांमध्ये घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचत असल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. ही सकारात्मक बदलाची दिशा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे श्री.पुजार म्हणाले.

जिल्ह्यात दर तीन वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे धरणे, कालवे, बंधारे यांसारख्या प्रकल्पांबरोबरच स्थानिक स्तरावर पाणी साठवणूक आणि पुनर्भरणावर भर देणे आवश्यक आहे, असे सांगून श्री.पुजार म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या घराजवळ सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी शोषखड्डे तयार केल्यास भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. ‘जलयुक्त शिवार’ योजनेसह विविध शासकीय योजनांद्वारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू आहेत.

  • Related Posts

    रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – देशातील रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic…

    १ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक ;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/मुंबई विशेष वृत्तसेवा:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *