महिला सक्षमीकरणाचा उत्सव :धाराशिव येथे २७ मार्चपासून तीन दिवसीय ‘नवतेजस्विनी महोत्सव’”

Spread the love

धाराशिव – महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या ५१ व्या वर्धापन दिनानिमित्त नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत २७ ते २९ मार्च २०२६ दरम्यान धाराशिव क्लब मैदान,शहर पोलीस स्टेशनजवळ,धाराशिव येथे “नवतेजस्विनी महोत्सव” चे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन २७ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी श्री.किर्ती किरण पूजार यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वयंसहाय्य महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री तसेच महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात जिल्ह्यातील विविध प्रकारचे सुमारे ४० स्टॉल सहभागी होणार असून,गावरान धान्य,कडधान्य,राजमा, तूप,अंडी,वर्मी कंपोस्ट खत,दुग्धजन्य पदार्थ,मसाले,पापड,कुरडई,शेवय्या, मनुके,शोभेच्या वस्तू,मूर्ती,फ्लॉवर पॉट, रेडीमेड कपडे आदी विविध उत्पादनांचा समावेश असणार आहे.या माध्यमातून महिला बचतगटांना आपल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.तसेच या तीन दिवसांच्या महोत्सवात विविध सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम, महिलांच्या आरोग्य व सकस आहार विषयक चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत.याशिवाय माविम मित्र व उत्कृष्ट बचतगटांचा सन्मान सोहळाही पार पडणार आहे.

या “नवतेजस्विनी महोत्सव” मध्ये जिल्ह्यातील तसेच शहरातील सर्व नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून महिला सक्षमीकरणासाठी सहकार्य करावे,असे आवाहन श्री.सुखदेव चिंचोलीकर,जिल्हा समन्वय अधिकारी,महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांनी केले आहे.


  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *