नशामुक्तीचा संदेश देत पोलीस प्रशासनाचा उपक्रम; १७५ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Spread the love

धाराशिव : अमली पदार्थांच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर युवा पिढीला योग्य दिशा देण्यासाठी पोलीस प्रशासनाने पुढाकार घेत जनजागृती मोहीम राबवली. दि. २३/३/२०२६ रोजी अमली पदार्थ विरोधी पथक, छत्रपती संभाजीनगर टीमतर्फे प्रॉपर धाराशिव येथील व्ही आर एम क्लासेसमध्ये नशामुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास एकूण १७५ विद्यार्थी तसेच तीन प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक,मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. युवकांनी व्यसनापासून दूर राहून शिक्षण,करिअर व सकारात्मक जीवनशैलीकडे लक्ष केंद्रित करावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सदर उपक्रम डीवायएसपी साईनाथ ठोंबरे,पोलीस निरीक्षक गीता बगाडे मॅडम,सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे, पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहेद मुल्ला, हनुमान पुरके तसेच हवालदार शैला टिळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे व निलेश सरपाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.पोलीस प्रशासनाच्या या पुढाकाराचे विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत केले. अशा प्रकारच्या जनजागृती उपक्रमांमुळे युवकांमध्ये जागरूकता निर्माण होऊन समाज नशामुक्त करण्यास मदत होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *