घरगुती गणनेपासून डिजिटल जनगणनेपर्यंत — धाराशिव सज्ज जनगणना-२०२७

Spread the love

धाराशिव – आगामी जनगणना-२०२७ संदर्भात राज्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात जनगणनेच्या पूर्वतयारीस सुरुवात झाली असून जनगणना कामकाजात संयुक्त सचिव तथा मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, मुंबई यांनी जनगणना संदर्भात टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करून दिली आहे.

जनगणना-२०२७ चे संचालन शासन व जनगणना कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या स्तरावरून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी,धाराशिव व जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी,धाराशिव यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्ययंत्रणेच्या स्तरावर जनगणना संबंधी घर यादी व गृहगणना (जनगणना २०२७ चा पहिला टप्पा) ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी चार्ज जनगणना अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली असून जिल्ह्यातील सर्व तहसीलदार हे चार्ज जनगणना अधिकारी म्हणून जनगणनेचे संपूर्ण कामकाज पार पाडणार आहेत.

जनगणना-२०२७ च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जनगणना पूर्वतयारीला गती देण्यात आली असून घर यादी व गृहगणना टप्प्यापासून डिजिटल जनगणनेपर्यंत सर्व प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.त्यासाठी चार्ज जनगणना अधिकारी (तहसीलदार व मुख्याधिकारी) यांच्या कार्यालयाच्या स्तरावर जनगणना कामकाजासाठी आवश्यक ते अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्यात घर यादी व गृहगणना ही मोहीम जिल्हास्तरावर व क्षेत्रीय कार्ययंत्रणेच्या स्तरावर प्रभावीपणे राबविण्यात येणार असून त्यासाठी धाराशिव जिल्ह्यात जनगणना – २०२७ चे कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ व संरचना निर्माण करण्यात आली आहे.

जनगणना पहिल्या टप्प्यासाठी जिल्ह्यात एकूण २८५० “इन्शी लिस्टिंग ब्लॉक्स (HLB)” निश्चित करण्यात आले असून २ मास्टर ट्रेनर,५२ फील्ड ट्रेनर,२८५० गणनाकर्मी (Enumerators) आणि ६२ पर्यवेक्षक (Supervisors) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.सर्व संबंधितांना जनगणना-२०२७ चे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात १८ प्रशिक्षण केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी,धाराशिव व जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी,धाराशिव यांच्या अधिनस्त जिल्हास्तरावर जनगणना कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यामध्ये तहसीलदार-महसूल व तहसीलदार-(निवासी) यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *