धाराशिवची सहा वर्षांची मायरा-फातेमा सलीम पठाण हिने पूर्ण केला पहिला रमजान रोजा

Spread the love

धाराशिव -: पवित्र रमजान महिन्यात श्रद्धा, संयम आणि सबुरीचे विशेष महत्त्व आहे. धाराशिव येथील अवघ्या सहा वर्षांच्या मायरा-फातेमा सलीम पठाण हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा (उपवास) पूर्ण करून कुटुंबियांचा अभिमान वाढवला आहे.
लहान वयातच धार्मिक संस्कार जोपासत मायरा-फातेमाने पहाटेच्या सेहरीपासून संध्याकाळच्या इफ्तारपर्यंत पूर्ण दिवस रोजा पाळला. दिवसभर आनंदी चेहऱ्याने आणि कोणतीही तक्रार न करता तिने हा रोजा पूर्ण केला. तिच्या या जिद्दीचे आणि श्रद्धेचे परिसरात कौतुक होत आहे.
कुटुंबियांनी सांगितले की, “मायराने स्वतःहून रोजा ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिच्या उत्साहामुळे आणि चिकाटीमुळे आम्हालाही आनंद व अभिमान वाटतो.”
रमजान महिन्यात लहान मुलांमध्ये धार्मिक संस्कार, शिस्त आणि संयम यांची जपणूक व्हावी, यासाठी मायरा-फातेमाचा हा पहिला रोजा प्रेरणादायी ठरत आहे.

  • Related Posts

    नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे

    Spread the love

    Spread the loveमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण मुंबई  -: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात…

    हैदराबादच्या भाविकाकडून श्री आई तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार-ढाल अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – हैदराबाद येथील श्री आई तुळजाभवानी देवींचे भाविक पटोला सबिथा इंद्रा रेड्डी यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार व ढाल अर्पण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *