दत्त भक्तीच्या साक्षीने रुईभरमध्ये भव्य कलशारोहण; १९ फेब्रुवारीला ग्रंथदिंडी व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी

Spread the love

रुईभर : येथील श्री दत्त मंदिर संस्थान, रुईभर यांच्या वतीने मंदिराच्या धार्मिक परंपरेतील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या भव्य कलशारोहण सोहळ्याचे आयोजन शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण रुईभर परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कलशारोहण सोहळ्यापूर्वी गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित भगवत सप्ताहाची सांगता होणार असून, त्यानिमित्त रुईभर नगरीत भव्य ग्रंथदिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीदरम्यान हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार असून, हा कार्यक्रम भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

कार्यक्रमासाठी बाहेरगावाहून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता, मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू व वैयक्तिक सामानाची स्वतः काळजी घ्यावी, असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थान, रुईभर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

धार्मिक परंपरा, सामूहिक भक्ती आणि सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक ठरणाऱ्या या भव्य सोहळ्यास गावातील तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  • Related Posts

    महाळंगी येथे श्री महालक्ष्मी देवीची आषाढ पाणी यात्रा उत्साहात साजरीभाविकांनी विविध धार्मिक कार्यक्रमांसह घेतला महाप्रसादाचा लाभ

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/धाराशिव:- तालुक्यातील महाळंगी येथील जागृत देवस्थान म्हणून भक्तांमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची आषाढ पाणी यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी दि.5 ऑगस्ट रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.…

    सुरवसे परिवाराचा श्रींच्या पालखी सोहळ्यात अन्नदान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला

    Spread the love

    Spread the loveभूम – दि.03/08/2026 रोजी मौजे साबळेवाडी फाटा ता.भूम येथे पहाटे सकाळी 05.00 वाजता श्री. क्षेत्र शेगांव संतश्रेष्ठ श्री.गजानन महाराज पालखी सोहळ्याचा भूम येथे मुक्कामी राहून पहाटे सकाळी शेगांव…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *