महाळंगी येथे श्री महालक्ष्मी देवीची आषाढ पाणी यात्रा उत्साहात साजरीभाविकांनी विविध धार्मिक कार्यक्रमांसह घेतला महाप्रसादाचा लाभ

Spread the love

विश्व प्रशांत न्यूज/धाराशिव:- तालुक्यातील महाळंगी येथील जागृत देवस्थान म्हणून भक्तांमध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री महालक्ष्मी देवीची आषाढ पाणी यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी दि.5 ऑगस्ट रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यात्रेत देवीच्या दर्शनासाठी भाविकांची दिवसभर मोठी गर्दी झाली होती. यात्रेत आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.

धाराशिव तालुक्यातील महाळंगी येथे सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक प्रशांत साळुंके यांच्या शेतात मशागतीसाठी खोदकाम करताना श्री महालक्ष्मीची मूर्ती आढळून आली होती. मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करुन भव्य मंदिर उभारण्यात आलेले आहे. या देवीच्या दर्शनासाठी येणारे हजारो भाविक नवस बोलतात आणि संततीप्राप्ती झालेले दांपत्य येथे नवसपूर्तीसाठी येतात, अशी माहिती प्रशांत साळुंके यांनी दिली. आषाढ पाणी यात्रेनिमित्त दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळी देवींची मूर्ती व पालखीचे पुजाऱ्यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर मानकरी भारत ढवळे यांच्या निवासस्थानापासून पालखीचे वाजत गाजत मंदिराकडे प्रस्थान झाले.
पालखी मंदिरात दाखल झाल्यानंतर भाविकांचे नवसपूर्ती व इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. या यात्रेत महाळंगीसह चिखली, रूईभर, आंबेवाडी, बेंबळी व पंचक्रोशीतील भाविकांच्या दर्शनासाठी दिवसभर रांगा लागल्या होत्या. यात्रेत आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

  • Related Posts

    विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर दि. २३ (प्रतिनिधी )छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे जिल्हास्तरीय विविध विभागांची आढावा…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – कर्नाटक राज्यातील बीदर येथील प्रणय बेमलखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण केला. प्रणय बेमलखेडकर हे आपल्या कुटुंबीयांसह आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *