श्री क्षेत्र मेडसिंगा येथे उद्या काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिर प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा

Spread the love

मेडसिंगा (प्रतिनिधी) – श्री क्षेत्र मेडसिंगा येथे काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना व मंदिर कलशारोहण सोहळ्याचे आयोजन उद्या, बुधवार दि. २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिर संस्थान समिती, मेडसिंगा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सोहळ्यास गुरुवर्य हभप नवनाथ महाराज जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या शुभहस्ते आणि मार्गदर्शनाखाली सकाळपासून होम-हवन, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना विधी तसेच वेदमंत्रांच्या गजरात मंदिर कलशारोहण सोहळा पार पडणार आहे.
मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून ग्रामस्थ आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होणार आहे. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिर संस्थान समितीने दिली आहे.
काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिर हे पंचक्रोशीतील श्रद्धास्थान मानले जाते. नव्याने साकारलेल्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  • Related Posts

    विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर दि. २३ (प्रतिनिधी )छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे जिल्हास्तरीय विविध विभागांची आढावा…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – कर्नाटक राज्यातील बीदर येथील प्रणय बेमलखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण केला. प्रणय बेमलखेडकर हे आपल्या कुटुंबीयांसह आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *