हशिश ऑईल तस्करी प्रकरणात मोठे यश; धाराशिव पोलिसांनी गाठला मुख्य आरोपी

Spread the love

धाराशिव : नळदुर्ग पोलिसांनी 10 कोटी 38 लाख 20 हजार रुपये किमतीच्या हशिश ऑईल तस्करीप्रकरणी मोठी कारवाई करत मुख्य आरोपीला ओडिशा राज्यातील अतिशय दुर्गम आणि नक्षलप्रभावित भागातून अटक केली आहे. या धाडसी मोहिमेमुळे धाराशिव पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
दि. 19 एप्रिल 2026 रोजी रात्री नळदुर्ग पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असताना संशयित आरोपींनी पोलिसांना पाहताच त्यांच्या कारमधून हशिश ऑईलने भरलेली बॅग फेकून घटनास्थळावरून पळ काढला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून अमली पदार्थ जप्त करत नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 114/2026 अंतर्गत NDPS कायद्याच्या कलम 8(क), 20(ब), 20(ii)(C), 25 आणि 29 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली असून यापूर्वी दोन आरोपींना नाशिकच्या मालेगाव येथून अटक करण्यात आली होती.
दरम्यान, हशिश ऑईलचा पुरवठा करणारा मुख्य आरोपी ओडिशा राज्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, त्याचे केवळ नाव समोर आले होते. तो नेमका कुठे राहतो, कसा दिसतो आणि त्याची ओळख कशी पटवायची, हे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
दि. 6 मे 2026 रोजी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक ओडिशा राज्यात रवाना झाले. पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, मेहबूब अरब आणि रोहित दंडनाईक यांचा पथकात समावेश होता.
तपासादरम्यान आरोपी प्रसेनजित ख्रिमहन दास (वय 33, रा. ओडिशा) हा जनतापाई परिसरातील अतिशय दुर्गम, पहाडी आणि नक्षलप्रभावित भागात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष सूचनांनुसार पोलिसांनी धाडसी मोहीम राबवत आरोपीला यशस्वीरित्या ताब्यात घेतले.
सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी नळदुर्ग पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    लातूरच्या ट्युशन एरिया परिसरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; मोटार वाहन कायद्याच्या ८६ केसेस, ५८,५०० रुपये दंड व ७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई.

    Spread the love

    Spread the loveलातूर शहर हे राज्यभरात शैक्षणिक पॅटर्नसाठी प्रसिद्ध असून दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे दाखल होतात. ट्युशन एरिया परिसरात सायंकाळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेस बाधा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *