ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ वाढायला पाहिजे – श्री.गजानन गाडेकर

Spread the love

धाराशिव ग्रंथोत्सव २०२५ चे थाटात उद्घाटन

ग्रंथ दिंडी ठरली मुख्य आकर्षण

  • धाराशिव – आपणाला सर्व प्रकारचे ज्ञान मिळण्याचे ग्रंथ व साहित्य हे मुख्य साधन आहेत. ग्रामीण भाग हा वाचनाच्या चळवळीत पहिल्यापासूनच सक्रिय आहे.त्यांची सक्रियता अधिक तीव्र करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ जोमाने वाढायला पाहिजे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाचे संचालक अशोक गाडेकर यांनी आज १४ फेब्रुवारी रोजी केले
  • वाशी शहरात आयोजित धाराशिव ग्रंथोत्सव – २०२५ अंतर्गत बाल वारकऱ्यांची ग्रंथ दिंडी काढण्यात आली.या दिंडीत विठ्ठल -रुक्मिणी, संत तुकाराम,संत मिराबाई यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ,महात्मा गांधी,महात्मा ज्योतिबा फुले,माता सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदी महापुरुषांच्या वेशभूषेत साकारलेली मिरवणूक हे ग्रंथोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले.

वाशी येथील अजिंक्य विद्या मंदिर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव व तालुका ग्रंथालय संघ वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष व.ग.सुर्यवंशी अध्यक्षस्थानी होते.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ. गजानन कोटेवार,वाशी नगर पंचायतच्या नगराध्यक्ष विद्याताई गायकवाड,छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे,मराठवाडा विभागाचे प्रमुख कार्यवाहक राम मेकले,पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विनोद गायकवाड, अजिंक्य विद्या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष एस.एल.पवार,जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे, निरीक्षक शिवशंकर कटाळे, सुधाकर बुकन आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना अशोक गाडेकर म्हणाले की,सोशल मीडियामुळे तरुण पिढीचा वाचनाकडे कल कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुकास्तरावर ग्रंथोत्सव साजरे करून सर्व प्रकारची पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचे आणि वाढविण्याचे काम समाजाच्या हितासाठी व्हावे,असे त्यांनी आवाहन केले.

अध्यक्ष व.ग.सुर्यवंशी यांनी ग्रंथालयांमध्ये सर्व प्रकारची पुस्तके,विशेषतः स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली.

  • Related Posts

    क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग…

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *