जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी तुळजापुरात आता ‘व्हीव्हीआयपी’ विश्रामगृह

Spread the love

तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

धाराशिव  (प्रतिनिधी ) – तुळजापूरचा कायापालट होत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाची ४३८ कोटी रुपयांची निविदाही प्रसिद्ध झाली आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. पुढील काळात जगभरातील पर्यटक, अभ्यासक आणि भाविकांची तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी अपेक्षित आहे. जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून तुळजापूरचा लौकिक जगभरात वाढणार आहे. या लौकिकाला साजेसे भव्य आणि ‘व्हीव्हीआयपी’ विश्रामगृहाला उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. त्यासाठी १६ कोटी ३५ लाख रुपयांची मान्यताही मिळाली आहे. लवकरच ३४ हजार चौरस फुटांचे भव्य आणि आधुनिक व्हीव्हीआयपी विश्रामगृह तुळजापुरात उभारले जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेले विश्रामगृह ५९ वर्ष जुने असल्यामुळे प्रशस्त आणि आधुनिक इमारतीची गरज होती, त्यासाठी आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

तुळजापूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे येथे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक व व्हीआयपी मान्यवर दर्शनासाठी येतात. सध्या अस्तित्वात असलेले विश्रामगृह १९६७ साली बांधलेले आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत ते अपुरे पडत आहे. त्याचबरोबर विश्रामगृहाची इमारत जुनी झाली आहे. भाविकांचा वाढता ओघ पाहता एका प्रशस्त आणि आधुनिक इमारतीची आवश्यकता असल्याने आपण त्यादृष्टीने प्रयत्न केले आणि नवीन विश्रामगृहाच्या बांधकामाला आता उच्च स्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या (VVIP) भाविकांच्या निवासाचा प्रश्न आता कायमचा सुटणार आहे. तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा भव्य ‘VVIP शासकीय विश्रामगृह’ इमारतीच्या बांधकामासाठी १६ कोटी ३५ लाख रुपयांची मंजुरी मिळाली असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. ज्या ठिकाणी ही नवीन वास्तू उभी राहणार आहे, त्या ठिकाणी सध्या तीन जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारती आहेत. या इमारती सध्या वापराविना पडून असून, नवीन प्रकल्पासाठी त्या पाडण्यात येणार आहेत. ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची (सिटी सर्व्हे क्र. ९०२) असून एकूण क्षेत्रफळ १,१८,९२० चौ.फूट इतके विशाल आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत हे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे.

असे असेल नवीन व्हीव्हीआयपी विश्रामगृह

प्रस्तावित विश्रामगृहाची इमारत ही ‘जी प्लस टू’ अर्थात तळमजला अधिक दोन मजले अशा स्वरूपाची असून ती पूर्णपणे आरसीसी फ्रेम स्ट्रक्चरमध्ये असेल. या इमारतीचे एकूण जोते क्षेत्रफळ ३,१६८ चौ.मी. (३४,१०० चौ.फूट) इतके भव्य आहे. विशेष म्हणजे, वास्तुशास्त्रज्ञांकडून या इमारतीचे नकाशे तयार करण्यात आले असून त्याला उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञांची तत्वतः मान्यताही मिळाली आहे. त्यानुसार तळमजल्यावर ४ व्ही.आय.पी. सूट, मीटिंग हॉल, डायनिंग, किचन, चालक रूम तर पहिल्या मजल्यावर २ व्ही.व्ही.आय.पी. सूट, २ सेमी व्ही.आय.पी. सूट आणि दुसऱ्या मजल्यावर २ व्ही.व्ही.आय.पी. सूट, २ सेमी व्ही.आय.पी. सूटच्या बांधकामास मंजुरी मिळाली आहे.

  • Related Posts

    क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

    Spread the love

    Spread the loveधाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग…

    मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *