बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

Spread the love

तुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये तसेच भाविकांची धार्मिक विधी व अधिकृत पुजाऱ्यांकडूनच पूजा व्हावी, यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने अनधिकृत पूजारी व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.

या पथकात सहायक व्यवस्थापक (धार्मिक), सुरक्षा निरीक्षक, SISPL Pvt. Ltd. चे सुरक्षा पर्यवेक्षक तसेच मंदिर संस्थानचे दोन शिपाई यांचा समावेश आहे. हे पथक मंदिर परिसरात नियमितपणे पाहणी करून अनधिकृत पूजारी व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवत आहे.

आज सकाळी पथकाने केलेल्या पाहणीदरम्यान अमर वसंतराव शेळके व रवी दत्तात्रय शिरसाट या दोन व्यक्ती अनधिकृतपणे पुजारी व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. संबंधित व्यक्ती मंदिरातील नियमांचे उल्लंघन करत असल्याचे तसेच त्यांच्या कृतीमुळे मंदिरातील शिस्त व व्यवस्थापनास बाधा निर्माण होत असल्याचे आढळून आले.

या प्रकरणाची नोंद घेऊन संबंधित व्यक्तींना पुढील कारवाई साठी तुळजापूर पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आले आहे.

  • Related Posts

    गुन्हा नोंद करण्याचे आदेश – बीएलओ कादरींना दणका, राजकीय पक्षाच्या कार्यालयात मतदार नोंदणी भोवली, 6 रडारवर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज निवडणूक अनुषंगीक कामकाजात टाळाटाळ केल्यामुळे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तथा शम्स उलूम उर्दु हायस्कूलचे सहशिक्षक सय्यद जुनेद कादरी यांचे विरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950…

    आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; 146 गुन्हे दाखल, 126 आरोपी अटकेत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) : विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *