स्वाधार योजनेतील २५९ विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीग्रस्त; ३१ जानेवारीपर्यंत त्रुटीपूर्तता व हार्डकॉपी सादर करावी

Spread the love

धाराशिव – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२५-२६ अंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने त्रुटीपूर्तता व अर्जाची हार्डकॉपी जमा करण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ जानेवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या किंवा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील इयत्ता ११ वी,१२ वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे,यासाठी या योजनेअंतर्गत भोजन भत्ता,निवास भत्ता,निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. आयुक्त,समाज कल्याण यांच्या दिनांक ३१ जुलै २०२४ च्या परिपत्रकानुसार वसतिगृह प्रवेश व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने सन २०२५-२६ करिता स्वाधार योजनेसाठी एकूण १७५८ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी २५९ विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आढळून आले आहेत. तसेच ११२ विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत ऑनलाईन प्रणालीवर भरलेल्या अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रांची हार्डकॉपी समाज कल्याण कार्यालयात जमा केलेली नाही.

तरी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत त्रुटीपूर्तता केलेली नाही तसेच अर्जाची हार्डकॉपी (अर्ज व आवश्यक कागदपत्रांचा संच) समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे सादर केलेली नाही,अशा विद्यार्थ्यांनी अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२६ पूर्वी त्रुटीपूर्तता करून आवश्यक कागदपत्रे कार्यालयात जमा करावीत.विहीत मुदतीत त्रुटीपूर्तता व कागदपत्रे जमा न केल्यास संबंधित अर्ज अपात्र ठरविण्यात येईल,याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.याबाबतीत कोणतीही अडचण असल्यास सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, धाराशिव या कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन श्री.सचिन कवले,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांनी केले आहे.

  • Related Posts

    तुळजापूर येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आगमन ; जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

    Spread the love

    Spread the loveधाराशिव,दि.३० जुलै (जिमाका) महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून…

    शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वेळेत मिळावा ; जिल्हाधिकाऱ्यांची आधार प्रमाणीकरण प्रक्रियेची प्रत्यक्ष पाहणी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६चा लाभ पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय आणि वेळेत मिळावा,यासाठी प्रशासनाने गावपातळीवर देखरेख अधिक प्रभावी केली आहे.या पार्श्वभूमीवर आज गुरुवार ३० जुलै…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *